Top News

लोंढोली येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यु.


मंगेश शामराव ठाकुर वय ३६ वर्षे.
Bhairav Diwase.    July 28, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील लोंढोली येथील नामक मंगेश शामराव ठाकुर वय ३६ वर्षे या युवकाला शेतात काम करीत असतांना साप चावल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना आज पहाटे ४ च्या सुमारास घडली.सदर व्यक्ती शेतात रोवनी करण्याकरिता हुंडयाच्या कामावर जात होता.काम करीत असतांना सापाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्याकरिता गडचिरोली येथील दवाखान्यात दि.२७ जुलै ला हलविन्यात आले आणि उपचारा दरम्यान आज पहाटे ४ च्या सुमारास मृत्यु झाला.
मयत व्यक्तीच्या कुटुंबाची हलाखीचि स्थिती आहे तर कमवता व्यक्ती कुटुंबातील गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
 सदर घटना व शेतातील मौका चौकशी कृषी सहायक एन ए कुंभारे,हरांबा साजा पटवारी रमेश झिटे व कोतवाल शुभम चौधरी यांनी गावातील उपसरपंच दिलीप लटारे यांच्या समक्ष करीत आहेत. हलाकीची परिस्थीत असल्याने त्वरीत मदत द्यावी अशी मागणी लोढोली वासिय करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने