Click Here...👇👇👇

वेकोली प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेचा गावकर्यांना फटक गोवरी नाल्यालगतचे मातीचे ढिगारे तात्काळ हटवीन्याकरीता शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

Bhairav Diwase
नाल्याच्या पात्राला व शेजारील गावंना मोठा धोका उढ्भवत आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाने तात्काळ हे ढिगारे हटवावे.
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील गोवरी  या गावातील नाला सध्या पाणी भरून वाहत असून त्या नाल्यातील पाण्याचा फटका अनेक गावांना बसनार आहे. त्याचे कारण म्हणजे वेकोली प्रशासनाचे नियोजनशून्य काम.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वेकोली मार्फत जमिनीचे उत्खनन सुरू आहे. उत्खनामधे निघालेले माती गोवरी गावातील नाल्याच्या पात्रात टाकल्या जात आहे. वेकोली तर्फे हे माती टाकण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी कुठलेही योग्य नियोजन न करता  मोठ्याप्रमात खोदकामातील निघालेली माती या नाल्याच्या पात्रात आणून टाकत आहे. त्यामुळे नाल्याच्या पात्रावरून त्याचा परिणाम होत पात्र लहान झाले. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली असून अवघ्या एक दोन पाऊसातच हा नाला डुधलिभरुन वाहत आहे.त्यामुळे नाल्याच्या पात्राला व शेजारील गावंना मोठा धोका उढ्भवत आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाने तात्काळ हे ढिगारे हट्वावे यांकरीता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे ,माजी जिल्हा उपप्रमुख बबन उरकुडे ,चंद्रपुर शहर प्रमुख प्रमोद पाटील ,राजुरा नगर परिषद चे नगरसेवक राजेंद्र डोहे , निलेश गंपावार , वसीम शेख ,अजय साकीनाला यांच्या शिष्टमंडळने चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी स्वप्नील मोहूर्ले ,मनोज कुरवटकर ,महेश चेने, सुरेश बुटले आदींची उपस्थिति होती. कुठल्याही प्रकारची जीवित हानि होण्याअगोदरच योग्य उपाययोजना कराव्या आणि हे अनैसर्गिक संकट टाळावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून वेकोली प्रशासन व मिट्टी कंपनीला धडा शिकवेल असे जिल्हा प्रमुख संदीप गीर्हे व  माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांनी तभा शी बोलतांना आपले मत व्यक्त केले.