सावली-जिबगाव-हरांबा रस्त्याची डागडुजी सुरू.

Bhairav Diwase
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम, संबंधित विभागाने केले सुरू.
Bhairav Diwase. Aug 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- ग्रामीण भागातील जनतेचा शहराशी संपर्क व्हावा. वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गाव तिथे रस्त्याची निर्मिती करण्यात आली. मात्र सततच्या ओव्हरलोड आणि पावसाच्या धडाक्यात रस्त्याची कशी वाट लागते त्याचे ताजेतवाने उदाहरण सावली ला जोडनारा जिबगाव हरांबा मार्गावर पडलेल्या जीवघेण्या रस्त्यावरून दिसून येते आहे. त्यामुळे रस्त्याच्या वेळोवेळी करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे. मग शासनाचा कामानिमित्त खर्च झालेला लक्षावधी रुपये व्यर्थ जातात की काय मात्र कंत्राटदार कामे करून मोकळे होतात. या बाबतीतही शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात प्रहार संघटनेतर्फे प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी सदर विभागाला निवेदन देवून व खड्याबाबत अनेक बातम्या प्रकाशित करून या कडे संबंधित विभागाचे लक्ष वेधले. तसेच जर का रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता. त्यामुळे या सर्व बाबींचा प्रभाव होऊन संबंधित विभागाने सदर मार्गावरील पडलेले खड्डे बीजविण्याचे काम आज दि. 24 आॅगस्ट ला सुरू केले. त्यामुळे प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेल्या मागणीला यश आल्याने त्या मार्गावरील सर्व जनतेने प्रहार सेवक संघटनेकडे एका आशेचा नजरेने पाहण्यास सुरुवात केलेली आहे.