आपल्या गावात कोराना रुग्ण वाढु नयेत, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी:- मनिषाताई चिमुरकर जि.प.सदस्या

Bhairav Diwase
हिरापुर गावात माॅस्क आणि साॅनीटाझर वाटप.
Bhairav Diwase. Aug 19, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील हिरापुर येथे कोविड -19 अंतर्गत एकूण 6 व्यक्ती बाधत झाले होते. दिनांक 11ऑगस्ट 2020 पासुन हिरापुर ता. सावली संपूर्ण लॉकडाऊन मध्ये आहे.
जनजीवन विस्कळीत झालेले आहे याची माहीती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या सौ.मनिषाताई चिमुरकर यांनी हिरापुर येथे भेट दिली व संपूर्ण परिस्थितीची माहीती घेतली या वेळी त्यांनी अधिकचे रुग्ण सापडुनये म्हणून अधिकाऱ्यांना सुचना केल्या आणि संपूर्ण गावातील लोकंना मास्क आणि सेनीटायझर ऑईल चे वाटप केले या प्रसंगी गावातील सरपंच बंडूजी मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, नितीनजी गोहणे,मोतीराम चिमुरकर, संजय सायत्रावार ग्रामसेवक, सेडमाके तलाठी साहेब आणि सर्व आरोग्य टिम व आधिकारी उपस्थित होते.