(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मूल तालुक्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असतांना आज मूलचे माजी नगराध्यक्ष अॅन्टीजेन तपासणीत कोरोना बाधीत निघाल्याने खळबळ उडाली आहे. मूल येथील वार्ड नं. 1 मधील हे रूग्ण असल्याने प्रशासनाने ‘तो’ वार्ड सिल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
मूल तालुक्यात सोमवारी आरटीपीसीआर तपासणीसाठी 47 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले त्यापैकी 6 बाधीत निघाले तर मंगळवारी 18 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले त्यापैकी केवळ एकाचा अहवाल आला असून तो चिचाळा येथील बाधीत आहे, तर 17 नागरीकांचा अहवाल अजुनही प्रतिक्षेत आहे, आज अॅन्टीजेन तपासणीत तिन नागरीकांचा अहवाल बाधीत आलेला आहे, यामध्ये मूल येथील माजी नगराध्यक्ष सह येथील उपजिल्हा रूग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यां सहभाग आहे.