Click Here...👇👇👇

१८ सप्टेंबर पासून होणार अधिक मासाला प्रारंभ.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- सप्टेंबर पासून अधिक मासाला सुरूवात होणार आहे . सप्टेंबरच्या पहिल्या आठवडा पार केला तरी कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यावर्षीचा अधिकमासही कोरोनाच्या सावटात जाणार असून, नवरात्री, दसरा, दिवाळी हे सणही कोरोणाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. अधिक मास म्हटला की, जावाईबापुंसाठी एक पर्वणीच असते. या वर्षी अधिक मास कोरोनाचा सावटाखाली येत असल्याने जावयांच्या जेवणावळीवर धोंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागात आजही अधिक मास हा धोंडयाचा महिना या नावाने ओळखला जातो. या महिन्यात खासकरून जावयांना धोंडे जेवणासाठी सासुरवाडीत निमंत्रीत केले जाते . अनेक जावयांना सासरकडून कपडयांसह एखादी भेटवस्तू दिली जाते. यासाठी जावई आवर्जून सासुरवाडीला जातो . त्यांच्या सोबत अन्य मंडळींना आमंत्रित केले जाते. यात नवा - जुना सर्व जावायांचा मानमरातब राखला जातो. त्यामुळे धोंडूयाचा महिना जावयांसाठी एक पर्वणीच असते. तर सासरच्या मंडळीसाठी हा एक कसोटीचा क्षण असतो.या वर्षी १८ सप्टेंबरपासून अधिक मासाचा प्रारंभ होत आहे. तो । 6 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे अश्विन महिन्यातील घटस्थापनेसह दसरा व येणारे सर्व सण महिनाभर पुढे लांबणार आहेत. दरम्यान हिंदू धर्मात या महिन्यात अनेक धार्मिक व्रत वैकल्पाचे महत्व आहे.परंतु कोरोनामुळे अनेक मोठी मंदिरे बंद असल्याने अनेकांना घरातच विधी पार पाड लागणार आहे . एकंदरीत यंदा अधिक मासावर कोरोनाचा सावट असले तरी त्यातही अनेक जण जावाई व लेकीसाठी धोंडे जेवणाची तजवीज करताना दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात ही परंपरा पाळली जाते.