Bhairav Diwase. Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- दुर्गापूर वार्ड क्रमांक ३, चंद्रपूर या प्रभागात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे फिरणे सुरू असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नुकतेच उर्जानगर परिसरात एका चिमुकलीचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची बातमी ताजी आहे. त्यामुळे सदर प्रभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी आपली भीती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संयोजक आयु. शार्दूल गणवीर यांना बोलून दाखविली असता त्यांनी पक्ष-कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेऊन दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी सदर परिसरातील नागरिकांसमवेत चंद्रपूर वनविभागाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन दिले तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होता कामा नये म्हणून या प्रश्नाकडे शासनाने तात्काळ लक्ष पुरवावे अशी मागणी केली असता त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन शासकीय अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आले. याप्रसंगी आयु नागेशजी कडुकर माजी,त.मू.स.अध्यक्ष-आयु.अनिलजी राठोड, अजित रॉय, अतुल बावणे, रेश्मा मडावी, दुर्गाबाई गणवीर, अंजु रॉय इत्यादि नागरिक उपस्थित होते.