Click Here...👇👇👇

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा

Bhairav Diwase

बुलढाणा:- आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या १३ विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा शाळेत घडली आहे. यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून सर्व विद्यार्थ्यांवर बुलढण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

निवासी आश्रम शाळा असल्याने येथे विद्यार्थ्यांना दोन्ही वेळचे जेवण दिले जात असते. दरम्यान काल रात्री मुलांना जेवणात कढी आणि भात देण्यात आला होता. मात्र कढी आणि भात खाल्ल्याने काही जणांना त्रास जाणवू लागला होता.

शाळेतील १३ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. या मुलींना अचानक उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता. याबाबत शिक्षक शाळा अधीक्षकांना सांगण्यात आले. मुलींना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून यातील पाच विद्यार्थिनींनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.