Click Here...👇👇👇

खानगाव परिसरात सोयाबीन पिकाचे पंचनामे करणे सुरू.

Bhairav Diwase
नुकसान भरपाई नमूद करीत नसल्याचा माजी सरपंच तथा संचालक एकनाथ धोटे यांचा आरोप.
Bhairav Diwase.    Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील खानगाव परिसरातील सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदाचे पीक हातून जाणार असल्याने माजी सरपंच एकनाथ धोटे यांनी प्रशासनास निवेदन देऊन नुकसान भरपाई ची मागणी केली असता प्रशासन कडून पंचनामा करणे सुरू झाले असून मात्र नुकसान भरपाई नमूद करीत नसल्याचा आरोप धोटे यांनी केला आहे.

    तालुक्यातील खानगाव, बोथली, सावरी, परिसरातील शेत शिवारातील सोयाबीन पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदील होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा ही दखल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक एकनाथ धोटे यांनी घेत प्रशासनाला जागे करीत निवेदन दिले होते  खानगाव परिसरात पंचनामा करीत असताना  कृषी सहायक पी व्ही मापारे , सचिव सी बी नगराळे, तलाठी गोडभासे, पोलीस पाटील वामन पाटील, मारोती सोयाम, चंदू ढोक, राजेंद्र रामटेके, शंकर गजभिये, नंदकिशोर जांभुळकर, किसन दडमल, पुरुषोत्तम आवारी, आदी उपस्थित होते .

प्रशासन ने दखल घेत पंचनामे करणे सुरू केले आहे पंचनामा करीत असताना त्या शेतकऱ्यांचे नुकसान किती होत आहे याची नमूद करीत नसल्याचा प्रकार येत असल्याने प्रशासनाने नुकसान नोंद नमूद करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एकनाथ धोटे यांनी केली आहे.