गरजुवंत मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका महासचिव सुरज मारोती गव्हाने यांनी आपला वाढदिवसाच्या दिवशी वरुर येतिल विशाल शेंडे यांनी संत तुकोबाराया नावाने वाचनालय चालवत असून तिथे मोफत गरजूवंत मुलांना शिकवणी वर्ग चालू केली आहे या सर्वाची दखल घेत व नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे सुरज गव्हाने यांनी तेथील मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आले व वाचनालयाला छत्रपती शाहू महाराजांचा फोटो भेट देण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीथी म्हणून दिनेश भाऊ पारखी ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ, ओबीसी समन्वय समिती राजुरा चे सल्लागार केतन जुनघरे, ओबिसी समन्वय समिती राजुरा तालुका अध्यक्ष उत्पल गोरे, वाचनालयाचे व मोफत शिकवणी वर्ग सुरू करणारे तसेच ओबीसी समन्वय समिती राजुरा तालुका उपाध्यक्ष विशाल शेंडे सुरज भांबरे, युवा कवि आदित्य आवारी सहित ओबीसी समन्वय समिती चे सर्व पदाधिकारी व वाचनालयातील मुल उपस्थित होते.