वाणिज्य (कॉमर्स) म्हणजे नेमक काय?

जाणून घ्या:- डॉ पुर्णिमा मेश्राम यांच्या लेखणीतून उतरलेल्या लेखात

प्रा. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम
M.Com, M. Phil.Ph.D , B.Ed
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा.


 हॅलो बंधू आणि भगिनी मी चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स येथून डॉ पूर्णिमा विलास मेश्राम आपणाशी वाणिज्य या विषयावर संवाद साधू इच्छिता. वाणिज्य म्हणजे काय? असा प्रश्न जर मनाला भेडसावत असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. मुलांनो वाणिजय हे दुसरे-तिसरे काहीही नसून आमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या विभिन्न प्रकारचे कार्य करतो. त्या सर्व कार्यांचा थोडाफार प्रमाणात वाणिज्य शी निश्चितच संबंध येतो. 

  थोडक्यात सांगायचे झाल्यास आमच्या दैनंदिन गरजा भागविण्याचे जे श्रम, संघटन आणि कौशल्य लागते. त्या सर्वांचा ज्यात समावेश होतो. ते म्हणजे वाणिज्यशास्त्र चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे 2009 पासून वाणिज्य शाखा ज्याला आपण बी. कॉम या नावाने संबोधतो ही शाखा सुरू झालेली आहे. दरवर्षी या शाखेतून अनेक विद्यार्थी पदवी प्राप्त करतात. या शाखेत नैपुण्य प्राप्त व उत्कृष्ट अकॅडमी एक्सेलस असलेले प्राध्यापक वर्ग आहेत.

     या विषयामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना तर प्राप्त होतेच. त्यासोबतच पुढील आयुष्यात एखादा उद्योग व्यवसाय स्थापन करून त्याद्वारे स्वयं रोजगार निर्मितीला चालना सुद्धा प्राप्त होते. या विषयामुळे समाजाला केवळ नोकरशहा वर्ग नाही, तर स्वयंरोजगार निर्माण करणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतो. ग्रामीण भागाचा विचार केल्यास विद्यार्थ्याला नोकरी मिळण्यासाठी आवश्यक विविध मुलांची बौद्धिक तयारी सुद्धा त्यांच्याकडून चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स द्वारे करून घेतल्या जातात. 
       
इंग्रजी आणि व्यवसायिक गणितांचे ज्ञान व अनुभव पाठिशी घेऊन वाणिज्य शाखेचा विद्यार्थी समाजात वावरतो. व त्याच्या जीवनातचे आर्थिक मूल्य नकळत वाढवीत असतो. आधुनिक युगात उद्योग व्यवसायाचे खाजगीकरण लक्षात घेता. प्रत्येक व्यक्तीच्या जीवना ला आकार देणारे वाणिज्य  विषयाचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. 

जे चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे चिंतामणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे दिले जाते. तेव्हा विद्यार्थ्यांनो विचार करा व वाणिज्य विषयात आपला प्रवेश निश्चित करा.

प्रा. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम
M.Com, M. Phil.Ph.D , B.Ed
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत