शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, प्रहार च्या मागणीला यश.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- संपूर्ण जग कोरोना महामारीच्या जीवघेण्या जाळ्यात अडकले असता त्यातून देश आणि देशाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजा याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्गाने सुद्धा पाठ दाखविल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक पेचप्रसंगात सापडला आहे.अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बळीराजासोबत घडली.
चिमूर ची ख्याती ही संपूर्ण भारतभर जाहीर आहे, देशाला स्वतंत्र मिळण्यागोदर चिमूर ला सर्वप्रथम स्वतंत्र मिळाले असता याच चिमूर येथे सोयाबीन पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे . परंतु कोरोनाच्या सावटात बळीराजा आर्थिक परिस्थितीतने आधीच हतबल झाला असताना निसर्गाने सुद्धा पाठ फिरविल्याने करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होऊन पिकावर आलेल्या रोगाने शेंगाची गळती होऊन ऐन तोंडघशीला आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाने जगावे की मरावे अशी द्विधा मनस्थिती येथील शेतकऱ्यांची झाल्याने चिमूर येथील प्रहार संघटना यांनी बळीराजाची व्यथा जाणून घेत चिमूर तालुका कृषी अधिकारी यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली.
यावेळी चिमूर प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक नारायण तिखाडे, प्रहार सेवक आदित्य कडू यांनी बळीराजाच्या हक्कासाठी त्वरित लाभ द्यावा यासाठी कृषी तालुका अधिकारी तिखे यांना पीक विमा तात्काळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित होत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.