मृतदेह शोधायला लागले 17 तास.
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी ला लागूनच असलेल्या दोंगेघाटावर दि . 26 सप्टेंबर शनिवारला दुपारी जवळपास 3:30 वाजता मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचं पाण्यात बुडून मृत्यु झाला. आणि मृतक मुलाचं शोध घेत असता, जवळपास सोळा सतरा तासांनी मृत देह दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सापडला.
मृतकाचे नाव राजकुमार कवळू सहारे ( 17 ) रा. देऊळगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील रहिवासी असू, मृतक अकरावी ला शिकत होता. मृतक पाच सहा दिवसापूर्वी देऊळगाव येथून ब्रम्हपुरी ला आपल्या आजीकडे मालताबाई श्रावण सहारे यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मित्रासोबत पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. आणि आज सकाळी 8 वाजता रविवारला मुलाचा मृतदेह सापडला. मृतकाच्या परिवारावर दुःखाचे डोंगर सावटले आहे . पुढील तपास ब्रम्हपुरी चे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. राजेश उंदिरवाडे करीत आहेत .