एन.पी.एस योजनेची सक्ती थांबवा:- प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Bhairav Diwase

संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी. 
Bhairav Diwase. Sep 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- एनपीएस योजनेची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना दिल्याशिवाय सक्ती करण्यात येऊ नये असे असताना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी १६ सप्टेंबर २०२० रोजी परिपत्रक निर्गमित करून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी एनपीएस योजना धारक कर्मचाऱ्यांचे सीएफआरएफ फार्म भरून घेण्याची सक्ती केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा सावलीच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पं . स . सावली यांना २१ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन एनपीएस योजनेच्या सक्तीचा विरोध केला आहे. निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांना पाठविण्यात आलेली असून एनपीएस योजनेची सक्ती केल्यास प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिला आहे. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा तदनंतर जिल्हा परिष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय ३ ऑक्टोंबर २००५, ७ जुलै २००७, २१ नोव्हेंबर २०१० व ५ जुलै २०१३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डीसीपीएस लागू करण्यात आलेली होती. शासनाने डीसीपीएस योजनेतील खात्यावर शासनाकडून दिले जाणारे अंशदान व व्याज दिले नाही. शासनाने लागू केलेली डीसीपीएस योजना फसलेली असताना एनपीएस ही योजना सुरू करण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना देऊनच एनपीएस खाते उघडणे संयुक्त होईल अशी कर्मचाऱ्यांची भावना असून याबाबतीत राज्यातील शिक्षक संघटनांनी शासनाला यापूर्वीच निवेदन सादर केले असताना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फतीने एनपीएस खाते उघडण्यासाठी पत्र निर्गमित करून सक्ती केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी तीव्र विरोध केला आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सरचिटणीस योगेश रामटेके कार्याध्यक्ष मिलिंद खंडाईत, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मंगला गोंगले, उपाध्यक्ष युवराज दुर्गे, सल्लागार रुपचंद थोरात, प्रसिद्धी प्रमुख ललित खोब्रागडे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे उपस्थित होते .