Bhairav Diwase. Oct 18, 2020
महाराष्ट्र राज्य:- गेले बरेच दिवस प्रतीक्षेत असलेल्या व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर दसऱ्याचा शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्या पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'एसओपी'चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा:- टिव्ही मुळे भाऊ झाला वैरी! लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
हेही वाचा:- चाकूने केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी.
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'एसओपी'चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार 'एसओपी'तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.