पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडुन मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करावी:- श्नी महेश देवकते, उपसभापती पंचायत समिती जिवती
अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन.
जिवती:- अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळने बाबत तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे मार्फत अतिक्रमण जमिनधारक व पट्टेदार यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या व अतिक्रमण धारक यांच्या शेतीचे जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई मिळण्या साठी आपल्या स्तरावरुन पंचनामे करावेत व सदर पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडुन मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करावी असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. जिवती पंचायत समिती सभापती सौ अंजना ताई पवार यांच्या कडुन अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळने बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जिवती पंचायत समितीच्या सभापती सौ अंजना ताई पवार, उपसभापती श्नी महेश भाऊ देवकते, जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरी केंद्रे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य सौ कमल ताई राठोड, पंचायत समिती सदस्य सौ अनिताताई गोतावळे, पंचायत समिती सदस्य श्री सुनील मडावी, पाटण ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्नी भिमराव पवार यांच्या उपस्थिती होती