घुग्घुस येथील कामगार नेत्यानी मद्यधुंद अवस्थेत पत्रकाराला घरात घुसुन केली मारहाण.

Bhairav Diwase
त. भा पत्रकार संजय पडवेकर यांच्या घरात घुसुन अश्लील शिविगाळ करीत मारहाण.

Bhairav Diwase. Oct 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथील कामगार नेते किशोर सिताराम बोबडे (५०) रा. श्रिराम वार्ड, क्रमांक २ हे वेकोलीच्या नायगांव कोळसा खाणीत कार्यरत आहे तसेच एका कामगार संघटनेचे नेते ही आहे.

मंगळवारला रात्री ८:४५ वाजता दरम्यान मद्यधुंद येथील पत्रकार संजय महादेव पडवेकर यांच्या घरात घुसुन तु आमच्या कोळसा खाणीची बातमी पेपरला का टाकली म्हणुन अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली तेव्हा घुग्गुस शिवसेना शहर प्रमुख हे तिथेच उपस्थित असल्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. 

पत्रकार संजय महादेव पडवेकर यांनी लगेच घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे यांच्या सोबत घुग्घुस पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. 

घुग्घुस येथील पत्रकार संजय महादेव पडवेकर यांना घरात घुसुन मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळताच घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, किसान काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रोशन पचारे, घुग्घुस भाजपाचे माजी शहराध्यक्ष विनोद चौधरी, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे ,माजी नकोडा उपसरपंच हनिफ मोहम्मद, काँग्रेस नेते शेखर तंगलपेल्ली, निखिल पुनगंटी, युवासेनेचे चेतन बोबडे, घुग्घुस सर्च टिवीचे प्रतिनिधी नौशाद शेख, पत्रकार पंकज रामटेके, भाजपा युवानेते कोमल ठाकरे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गर्दी केली. 

घुग्घुस येथील पत्रकार संजय महादेव पडवेकर यांच्या तक्रारी वरुन कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोन दिवस आधीच "नायगांव व निलजई कोळसा खाणीचे कामगार नेते हजेरी लावुन घरी परत येताता" अश्या आशयाच्या बातम्या वर्तमान पत्रातुन प्रकाशित झाल्या होत्या. 

याचाच राग मनात धरून कामगार नेते किशोर बोबडे यांनी आपल्या गुंडप्रव्रूत्तीचा सहकार्यांना सोबत घेऊन पत्रकार संजय पडवेकर यांच्या घरात घुसुन अश्लील शिविगाळ करीत मारहाण केली.

यातील सुनिल बांदुरकर यांच्या वर दारु तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे व तो कामगार नेते किशोर बोबडे यांचा हस्तक आहे.