Top News

पोंभूर्णा येथे रोडवर रात्रभर सुरू असलेल्या स्ट्रिट लाईट मुळे धानाचे नुकसान.


धान पिकाची मोका चौकशी करुन, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.
Bhairav Diwase.  Oct 29, 2020
पोंभुर्णा:- धान पिक लागवडीनंतर रोवणी, निंदन, खत-पाणी इत्यादी धान पिक लागवडीकरीता करण्यात येणारी संपूर्ण मशागत पूर्ण केली असून सदर धान पीक कालावधी पूर्ण होऊनही निसावा होत नसल्याने याबाबत कृषी विभाग व तज्ञ मार्गदर्शना कडून धान निसावा न होण्याचे कारणामिमांसा शोधली असता नगर पंचायत पोंभूर्णा यांनी रोडवर रात्रभर स्ट्रिट लाईट चालू ठेवल्याने निसवा होणार नाही असे कारण पुढे आले आहे.




     एकंदरीत स्ट्रीट लाईट मुळे रात्री धान पिकाची प्रजनन शक्ती खोळंबते व धान निसवा होत ना llही. त्यामुळे उपयुक्त शेतातील मी लागवड केलेले धान पिकातील निसवा अभावी नुकसान झालेली आहेत. त्यामुळे मला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. करीता माझ्या धान पिकाची मोका चौकशी करण्यात यावी. व नगरपंचायत यांच्या रात्रीच्या आगावू रोशनाई मुळे धान पिक निसवत नसल्याने नुसकान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात यावे.

मी मौजा पोंभूर्णा येथील कायमचा रहिवासी असून शेती हा माझा प्रमुख व्यवसाय आहे. मी पोंभूर्णा येथील नवीन बस स्टॅन्ड ला लागून आबाजी बुरांडे यांची पोंभुर्णा येथील सर्वे नंबर १४०९ आरजी अंदाजे तीन एकर ही शेतजमीन आहे. ती जमीन ठेका पद्धतीने मागील पाच वर्षापासून नियमित करीत असून सदर शेतजमिनीत मी चालू वर्षात धान पिकाची लागवड केली आहेत. सदर शेतीमध्ये जय श्रीराम वानाचे धान लागवड केली असून सदर १४० दिवसाचा आहे.
श्री. भुजंगराव ढोले शेतकरी
भोयर साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा धानाची पाहणी करतांना.

पोंभूर्णा येथे रोडवर स्ट्रिट लाईट लावण्यात आले. रात्रभर रोडवर स्ट्रिट लाईट सुरू राहते. स्ट्रीट लाईट मुळे रात्री धान पिकाची प्रजनन शक्ती खोळंबते व धान निसवा होत नाही. त्यामुळे स्ट्रिट लाईटची दिशा खालच्या बाजूला करण्यात यावी. जेणेकरून प्रकाश पिकांवर पळणार नाही.
भोयर साहेब कृषी अधिकारी 
पंचायत समिती पोंभुर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने