Top News

युवा स्वाभिमान पक्षाचा चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे दनका.


Bhairav Diwase.    Oct 29, 2020
चंद्रपूर:- स्वाभिमान पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज अंतर्गत काम करत असलेल्या समस्त कामगारांना मिळाली पगारवाढ.

सविस्तर वृत्त असे की शाप्रुजी पलोंजी या धनाढ्य कन्स्ट्रक्शन कंपनीने चंद्रपूर मध्ये मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचा कंत्राट महाराष्ट्र शासनाद्वारे घेतलेला आहे याठिकाणी बरेच दिवसांपासून कामगारांची पिळवणूक होत असल्या बाबत ची माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांना चार दिवस आधीच मिळाली होती सदर कंपनीला चार दिवसांपूर्वी सुरत ठाकरे यांनी जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन कामगारांचे वेतन तथा इतर समस्यांबाबत दहा दिवसांमध्ये तोडगा काढण्याचा सूचना दिली होती तसे न झाल्यास मेडिकल कॉलेज चे काम बंद करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी कंपनीला दिला होता. सुरेश ठाकरे यांचे एकंदर जुनी आंदोलने व पार्श्वभूमी पाहता कंपनीने त्याचा धसका घेऊन काल दिनांक २८/१०/२०२० रोजी सुरेश ठाकरे यांना चर्चला बोलून त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या.

         चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सूरज ठाकरे चे नाव कामगार क्षेत्रांमध्ये सातत्याने मोठे होत आहे व आता त्यांच्या साथीला अमरावतीचे आमदार श्री रवी राणा व अमरावतीच्या खासदार सौ नवनीत राणा आल्याने त्यांची ताकद दुपटीने वाढले आहे असे त्याच्या सर्व कामगार शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये आहे. सुरेश ठाकरे यांनी देखील कंपनी चे आभार मानले व अशाप्रकारे आमदारांना तथा स्थानिक बेरोजगारांना सहकार्य करावे अशी विनंती केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने