(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विनायक कोसरे, बल्लारपूर
चंद्रपूर:- आज गुरवारला सकाळी घुग्गुस परिसरातुन आरोपी पंकज सिंग व सोनल राँबर्ट दोघेही रा. घुग्गुस यांना घुग्गुस पोलिसांनी गुप्त माहिती आधारे सापळा रचून अटक केली.
मंगळवारला सायंकाळी दरम्यान नविनकुमार सिंग रा.घुग्गुस हा आपल्या चार चाकी वाहनाने चंद्रपूर येथून घुग्गुस कडे परत येत असतांना आरोपींनी सिनेस्टाईलने पाठलाग करून महाकुर्ला गावा जवळ फिर्यादीचे वाहन थांबवुन आरोपींनी लोखंडी राँड ने हल्ला केला व वाहनाच्या काचा फोडल्या फिर्यादीच्या तक्रारी वरुन घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पो.नि. राहुल.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सह.पो.नि. विरसेन चहांदे करीत होते.
घुग्गुस पोलिसांनी तपास चक्र जलद गतीने फिरवून घुग्गुस परिसरातुन सापळा रचून अटक केली.