शेणगाव येथील मारोती कपाळे यांच्या किराणा दुकान आगीत भस्मसात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- शेणगाव येथील मारोती कपाळे यांचा एक किराणा दुकाण होत त्यांचा प्रपंच त्याच दुकानावर चालायचा. पण दि. 12 आक्टोंबरला सायंकाळी मारोती कपाळे यांनी लाईट (विज)आपल्या दुकाणात नसल्याने खाद्य तेलाचा दिवा लावला होता. त्याच दिव्याने पेट घेतला त्या आगीत कपाळे यांच दुकान जळुन खाक झाल आहे. आगीत अंदाजे 3.5 लाख रुपयांच सामान जळाले. यात Tv, freeze आणि किराना सामान होते , या आगीत कपाळे यांना सुध्दा खुप भाजल आहे. गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग एकदम खुप पेट घेतली होती.

दुकानात प्लास्टिक च्या भरण्यामध्ये लहान मुलांचे गोळ्या बिस्कीटे राहतात त्याच प्लास्टिक च्या भरण्यामुळे कपाळे यांच दुकान जळुन खाक झाल.
 मारोती कपाळे यांच्यावर खुप मोठा आर्थिक संकट कोसळलं आहे. आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच वय पण खुप झालेल आहे अंदाजित 70 वर्षाचे असावेत..