(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयात चंद्रपूरचे पालकमंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देऊन चारे यांनी मागणी केली आहे.
मागील आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना पिक विम्याची रक्कम मिळवून देण्यात यावी व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा सर्वे करुन त्यांना आर्थिक मदत द्यावी जेनेकरुन त्यांची येनारी दिवाळी अंधारात जानार नाही.
निवेदन देतांना काँग्रेस एसी सेलचे जिल्हाअध्यक्ष पवन आगदारी, काँग्रेस शहराध्यक्ष राजु रेड्डी माजी सरपंच संजय निखाडे, सचिन गोगला, शितल कांबळे,गणेश आवारी,हितेश लोड़े,बबलू मुंडे उपस्थित होते.