गडचांदुर शहरात महीलांच्या समस्या सोडविण्या साठी निवेदन.

Bhairav Diwase
1 minute read

नगर परिषद मार्फत त्या भागात सुलभ शौचालय/मुत्रीघर, उपलब्ध करून देण्याची मागणी माणुसकी फाउंडेशन द्वारा मागणी.
Bhairav Diwase. Oct 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महीलांना शौचालय/ मुत्रीघर ची व्यवस्था करण्यात यावी जेने करुन आई, बहीणींना उघड्यावर जायची परीस्थिती निर्माण व्हायला नको या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात असे निवेदन माणुसकी फाऊंडेशन द्वारे देण्यात आले.
आज गडचांदुर येथील मुख्य बाजार पेठ असलेल्या नेहमी लोकांनची वर्दळ या ठिकाणी बघायला मिळते आसपास मोठा बाजार भरतो पण या भागात एक शौचालय उपलब्ध नाही. जवळ पास अर्धा किलोमीटर पर्यन्त एक हि शौचालय नाही या बाबीचानगर परिषद मार्फत त्या भागात सुलभ शौचालय/मुत्रीघर, उपलब्ध करून देण्याची मागणी माणुसकी फाउंडेशन द्वारा , नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेडके मॅडम यांना निवेदनातून केली आहे .या भागात त्वरित कारवाई करून या जागी फायबरचे शौचालय लाऊन देण्यात येईल असे आश्वासन दिन्यात आले यात माणूसकी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण सातपाडे व महीला सहकारी व सद्यस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण मेश्राम याच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले