(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे आज सकाळी शेतात गेलेल्या येथील उपसरपंच मारोती नेव्हारे, आणि दादाजी घोडमारे यांचेवर रानटी डुक्कराणे हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दिनांक 7 आक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली जखमीना चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले माहिती मिळताच चिंचोली नियत क्षेत्राचे वनरक्षक गोविंदा तम्हीवार यांनी जाऊन पंचनामा केला आणि जखमींची भेट घेतली पुढील तपास सुरु आहे
या भागात अगोदरच वाघाची दहशत सुरु असतानाच रानटी डुक्कराचे हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण झाले आहे