Click Here...👇👇👇

धनराज दुर्योधन यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रीन फाउंडेशन पुरस्कार जाहीर.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिल्या जाणा-या राज्यस्तरीय ग्रीन फाउंडेशन पुरस्कार नुकताच चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा पं. स. येथील उपक्रमशील शिक्षक धनराज रघुनाथ दुर्योधन यांना जाहीर झाला आहे.यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.निसर्ग संवर्धन,वृक्षारोपन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला ग्रीन फाउंडेशन पुरस्कार दिल्या जातो.
         विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासणारे विज्ञान विषय शिक्षक धनराज दुर्योधन यांनी शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबरोबर पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविले व विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाप्रती आस्था निर्माण केली.तंबाखुमुक्त शाळा केल्याबदल मा. गारकर साहेब (शिक्षणाधिकारी प्राथ. जि. प. चंद्रपुर) यांच्या हस्ते सन्मानचीन्ह प्रदान करण्यात आले.लाॅकडाऊनच्या काळात "ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन द्वारे घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेत "मानवी जीवनात झाडाचे महत्व''या विषयावर उत्तेजनार्थ क्रमांक मिळविल्याबदल आमदार मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार साहेब (माजी अर्थमंत्री महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते एक हजार रुपयाचे धनादेश प्राप्त झाले.तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चमत्कार सादरीकरण स्पर्धेत त्यांना उत्तेजनार्ध क्रमांक प्राप्त झाला आहे.
         या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रीन फाउंडेशन पुरस्कार जाहीर झाला आहे.माझ्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशन चे अध्यक्ष अमित जगताप यांचे त्यांनी आभार मानले आहे.
               २५ ऑक्टोबर २०२०ला हा पुरस्कार दिला जाणार आहे.ऑक्टोबरला हा दिवस विजयादशमी दसरा साजरा केला जातो.यावर्षी पुरस्कार वितरण सोहळा कोरोना व्हायरसमुळे ऑनलाइन होणार आहे.