महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- नगर पंचायत पोंभूर्णा अंतर्गत आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत थोर पुरुषांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण काम चालू आहे. सदर काम उत्कृष्ट व सुंदर होत आहे. पोंभूर्णा शहरात असलेल्या थोर महापुरुषांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करतांना पुतळ्याच्या मागील बाजूस भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. पुतळ्याचे सौंदर्यीकरण करीत असतांना सौंदर्यीकरणात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात येऊ नये.
परंतु पोंभूर्णा क्र. ८ मधील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस संरक्षण भिंतीचे बांधकाम केले नसल्यामुळे सौंदर्यीकरणात काहीतरी कमी झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याच्या मागील बाजुस विटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यात यावे व पुतळा उभा असलेल्या स्तंभास स्टाईल बसविण्यात यावे. जेणेकरून नागरीकांना पुतळा सौंदर्यीकरणात समानता दिसून येईल. अशी मागणी महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष भुजंग ढोले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका पोंभूर्णा व पोंभूर्णा वासीय जनतेकडून करण्यात येत आहे.