Pombhurna News: पेसा ग्राम, वनजमीनीच्या पट्ट्याच्या मागणीसाठी अन्नत्याग उपोषणाचा बारावा दिवस

Bhairav Diwase

पोंभूर्णा वनविभाग कार्यालयासमोर आदिवासी नेते जगन येलके यांचा अन्नत्याग
पोंभूर्णा :-पेसा ग्राम,वनजमीनीचे पट्टे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके यांनी यापूर्वी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. आ. मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने ७ नोव्हेंबरला आंदोलनाची सांगता झाली होती. त्यावेळी प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. लेखी आश्वासनानंतर कोणतेही मागण्या पूर्ण न झाल्याने दि. २७ नोव्हेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरु केले.अन्नत्याग उपोषणाचा दहावा दिवस लोटुनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे तोडगा निघाला नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा येलके यांनी घेतला आहे.

देवई, भटारी, केमारा या गावांना वनग्राम मधून काढून त्यांचे वनहक्के दावे तात्काळ मंजूर करण्यात यावे. आदिवासींना वनहक्क दाव्याचे सामुहिक व वैयक्तिक पट्टे देण्यात यावे. तालुक्यातील आदिवासी गावांना पेसा गाव म्हणून घोषीत करण्यात यावे, इको पार्क जबाबदारी चेक आष्टा वनव्यवस्थापन समितीकडे देण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेचे संस्थापक जगन येलके यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केला होता. आ. मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने ६ नोव्हेंबरला आंदोलनाची सांगता झाली होती. त्यावेळी प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. लेखी आश्वासनानंतर कोणतेही मागण्या पूर्ण न झाल्याने दि. २७ नोव्हेंबर पासून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. अन्नत्याग उपोषणाच्या बाराव्या दिवशी सुद्धा मागण्याची पुर्तता प्रशासनाने केली नाही. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील आदिवासींकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर सावित्रीबाई फुले चौकात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


पोंभूर्णा येथे १ कोटी रुपये निधीतून होत असलेल्या महिला बचत गट बाजारपेठेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आमदार सुधीर मुनगंटीवार आले होते.कार्यक्रम आटोपून मुनगंटीवार जगन येलके यांना भेट दिली होती.लवकरच तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासीत केले असल्याची माहिती आहे.


आदिवासी समाज बांधवाच्या हक्कासाठी आंदोलने आम्ही केलो आहोत. प्रशासनाचा मान ठेवून आंदोलन मागे घेतली आहेत.लेखी आश्वासन देऊनही जर मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही आदिवासींनी काय करावं.आता जो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही.
जगन येलके, संस्थापक गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ