ग्रामपंचायत फुटाणा यांनी काढलेल्या झाडांच्या लिलावास ग्रामस्थांचा विरोध.

Bhairav Diwase
लिलाव प्रक्रिया तात्पुरती थांबविण्याच्या सर्वंग विकास अधिकारी यांच्या सूचना.

ग्रामपंचायत फुटाणाचा मनमानी कारभार; पंचायत समिती कडून दणका.
Bhairav Diwase Oct 16, 2020
पोंभुर्णा:- पर्यावरण हा वातावरनातील महत्वाचा घटक. पर्यवरणाचा समतोल टिकविन्यासाठी व मानवी जनजीवन सुरक्षित राहन्या करिता झाडांचे अस्तित्व अतिशय महत्वाचे आहे.
                        फुटाणा येथे मामा तलावाच्या पारीवरील बाभळीचे झाडाचा जाहीर लिलाव दि. १६/१०/२०२० रोज शुक्रवारला ठिक. ११:०० वा जी. प. शाळा फुटाना येथे जाहिर करण्याचे नियोजित करण्यात आला होता.


         या झाडाच्या सावलीत मुके जनावरांना आसरा घेत असतो. जवळच पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही. त्या झाडांमुळे गावात शुध्द वातावरण निर्माण झाला आहे. "झाडे लावा झाडे जगवा" म्हणतो मग त्या झाडाला तोडण योग्य राहणार नाही. सर्वांचा मामा तलावाच्या पारीवरील बाभळीचे झाडाच्या लिलावाला ग्रामस्थांचा विरोध होता. ग्रामपंचायत कार्यकारिणी काही दिवसांत बरखास्त होणार आहे. व ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार आहे. मग येवढ्या तडकाफडकी लिलाव घेण्याचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पळला होता.

          एकीकड़े शासनाकडून "झाडे लावा झाड़े जगवा " हा मूलमंत्र घरा घरात देत असताना. त्या झाडांचा लिलावा द्वारे विक्री करून त्यांची कतल व मग उत्पन्न ही भूमिका ग्रामपंचायत कार्यालय फुटाणा कडून थांबवावी. या लिलावाला ग्रामस्थांचा विरोध असून तो लिलाव त्वरीत मागे घ्यावा. अशी मागणी फुटाणा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोंभुर्णा पंचायत समिती पोंभुर्णा चे सर्वंग विकास अधिकारी यांचे कडे केली होती. 
                                      
                   ग्रामस्थांच्या या मागणीला रास्त समजत सर्वंग विकास अधिकारी पोंभुर्णा यांनी सदर लिलाव प्रकियेला तुर्तास स्थगिती दिली आहे. व पुढील अहवाल सादर करण्याचे ग्रामपंचायत फुटाना चे सचिव यांना आदेश दिले आहेत.