राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शेतात काम करीत असताना महावितरण च्या खांबाला स्पर्श होऊन साठ वर्षीय शेतकरी चा नाहक बळी गेल्याची घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे घडली
प्राप्त माहिती नुसार विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली येथिल मारोती लोहट वय 60 वर्ष हा आज दुपारी 11 चे सुमारास नेहमी प्रमाणे शेतात काम करण्या करीता गेला असता रोडवर असलेल्या आपल्या शेतात कुंपण करीत असताना महावितरण च्या वीज खांबाला वीज प्रवाह सुरू होता दरम्यान खांबाला स्पर्ष होताच मारोती हा जाग्यावर कोसळला ,त्यावेळी तिथे कुणीच नसल्यामुळे ही बाब लक्षात आली नाही मात्र वडील घरी परत न आल्यामुळे त्याचा मुलगा शेताकडे गेला असता, वडील मृत अवस्थेत आढळले तेव्हा गावकर्यांना सांगितले असता गांवकरी धावून आले व सदर घटने ची माहिती विरुर पोलीस ठाण्यात व महावितरण कंपनीला देण्यात आली. महावितरण च्या दुर्लक्ष मूळे सदर घटना घडल्या चे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतक कुटूंबना योग्य न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.