५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश.

Bhairav Diwase
कोसमी-किसनेली जंगल परिसरात गोळीबार.
Bhairav Diwase. Oct 18, 2020

गडचिरोली:- उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल जंगलात परिसरात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली. मृत नक्षल्यामध्ये २ पुरुष व ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


           आज रविवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी सी-६० पथकाचे जवान कोसमी-कसनेली जंगल परिसरात संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यानी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्त्युत्तर देताच नक्षलवादी घटनास्थळावरून घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता २ पुरुष व ३ महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र या चकमकीत पोलिसांचे कुठलेही नुकसान झाले नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाने दिली. 

                गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी (15 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षात नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. गेल्या दोन वर्षात जवळपास ९० हून अधिक सशस्त्र नक्षलवादी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे.