वर्धा:- कोरोना संक्रमणाच्या काळात वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोना ग्रस्त रुग्णांना प्लाझ्मा थेरपी हा महत्वाचा उपचार असल्याची मत आरोग्य विभाग व्यक्त करित आहे त्याची दखल येथील रूग्ण मित्र गजू कूबडे यानी घेऊन प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने दि 18 आक्टोबरला अँटीबॉडी डीटेक्शन व प्लाझमा डोनेशन शिबिराचे आयोजन येथील हरी ओम मंगल कार्यालय येथे करुन गजू कुबडे यानी आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला आहे त्याच वेळी शहरातील नागरीकाना एक सुवर्ण संधी उपलब्ध करुन देऊन आपल्याला रुग्णमित्र का म्हणतात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवीले आहे. मुख्य म्हणजे या शिबिरात कोरोना मुक्त झालेल्या 51 दात्यानी आपली अँटीबॉडी डीटेक्शन करुन कोरोना रुग्णांसाठी प्लाझमा देण्याचा संकल्प केला आहे.
या शिबिरात प्लाझमा डोनेशन बद्दल लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डा.हरिष वरभे यांनी प्लाझमा डोनेशन संदर्भात मार्गदर्शन केले तसेच या वेळी लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या आरोग्यासाठी सदैव जागरुक राहून आरोग्याची काळजी घेणारे येथील तहसीलदार श्रीराम मुंधडा,ठानेदार सत्यजित बंडीवार,नप मुख्याधिकारी अनिल जगताप,उपजिल्हा रुग्णालयाचे कोरोना विभाग प्रमुख डॉ.भूषण वासाडे,येथील सामजिक कार्यकर्ते प्रविण उपासे,उपजिल्हा रुग्णालयातील वाहन चालक प्रमोद दुर्गे,प्रविण पुत्तेवार व गौतम यांचा प्रहार तर्फे मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी माजी नप अध्यक्ष पंढरीभाऊ कापसे हे होते.
कोरोना संक्रमानातून मुक्त झालेले रुग्ण 21 दिवसानंतर आपला प्लाझ्मा देऊन कोरोना रुग्णांना जीवदान देऊ शकते याच आधारावर हिंगणघाट येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते रूग्ण मित्र गजूभाऊ कुबडे यांनी कार्यकर्ते व मित्र परिवार यांच्या मदतीने या अभिनव शिबिराचे आयोजन करुन असंख्य जनतेला दिलासा दिलेला आहे. या शिबिरामध्ये कोरोना संक्रमनातून मुक्त झालेल्या 51 दात्यांनी आपला अँटिबॉडी डिटेक्शन करून कोरोना रुगणासाठी प्लाझ्मा देण्याचा संकल्प जाहिर केला आहे.या शिबिरात अँटिबॉडी डिटेक्शन केलेले कोरोना मुक्त रुग्ण गरजे नुसार कोरोना बाधीत रुग्णांना प्लाझ्मा देऊन कोरोना रुग्णांना मदत खूप मोठी मदत होऊ शकते.