अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- जिल्ह्यातील सर्व संबंधीत माजी सैनिक, विधवांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये वर्ग 12 वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले असल्यास प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत. सर्व संबंधित माजी सैनिक, विधवांनी त्यांचे पात्र पाल्यांचे ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2020 पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
त्याकरीता ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर असून अर्ज भरण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. तरी मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्कॅन करून प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चूकीचा अर्ज भरलेला असल्यास नाकारल्या जाईल.