ग्रामपंचायत खडकी रायपूर (लेंडीगुडा) येथे सार्वजनिक हातपंपा जवळ घाणीचे साम्राज्य.

Bhairav Diwase
एक ते दीड महिन्यापासून ग्रामपंचायतीच मात्र यांच्याकडे दुर्लक्ष.
Bhairav Diwase. Oct 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- ग्रामपंचायत खडकी रायपूर येथील लेंडीगुडा गावातील हात पंप दुरुस्ती करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी यांना कळविले असता सदर बाबीकडे गेल्या एक ते दीड महिन्यापासून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. हातपंप परिसरात घाणीचे साम्राज्य असून, येथे ही दुर्लक्ष केल्या जात आहे. ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामसेवक यांना या बाबीबद्दल कळवलं असता ग्रामपंचायत मध्ये निधी नससल्याच सागितले जात आहे. व फंड आल्यावर काम करु असे उडते उत्तर दिल्या जात आहेत. संरपच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामसेवकानी सागीतले आहे. हात पंपाच पाणी जाग्यावर न जिरवता पुर्ण घाणीचे साम्रज्य झाल्याचे दिसत आहे.सदर बाब वारंवार कळवून ही या बाबीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अशी माहिती गावातील शेतकरी व नागरिकांनी दिली आहे. या बाबतीत चौकशी करतांना विदर्भ राज्य युवा आघाडी जिवती तालुका अध्यक्ष अरविंद चव्हाण व उपाध्यक्ष निलेश राठोड यांच्या उपस्थितीत होते.
जगदंबा देवी मंदिर परिसरात पुर्ण होत घाण होत आसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या परीसरात लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. १४ व्या वित्त आयोग फंड गेला तरी कुठे असे विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अरविंद भाऊ चव्हाण सचिव विनोद पवार व गावातील नागरीक यांनी ग्रामपंचायत यांना प्रश्न केला असता ग्रामपंचायत उत्तर देत नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.