घुग्घुस येथील माँ शक्ति माँ दुर्गा उत्सव मंडळ चांदसावली वार्ड क्र.१ च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस येथील माँ शक्ति माँ दुर्गा उत्सव मंडळ चांदसावली वार्ड क्र.१ च्या वतीने घुग्गुस ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचारी कोरोना योद्ध्या महिलांना साडी वाटप व पुरुषांना शाल, टाँवेल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चंद्रपूर काँग्रेस एससी सेलचे जिल्हाअध्यक्ष पवन आगदारी, मंडळाचे अध्यक्ष गुड्डु शेख, सुरज बहुराशी, राजेश मोरपाका, प्रितम अटेला, इरफान शेख, वतन अटेला, प्रशांत अटेला व ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.