आदिवासी विविध कार्यकारी संस्था पोंभुर्णा येथील धान्य खरेदी केंद्रांमध्ये गावे समाविष्ट करण्यात यावी.

Bhairav Diwase
कृषी पदवीधर संघटना तालुका पोंभुर्णाची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी.
Bhairav Diwase. Oct 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था अंतर्गत शासकीय दराप्रमाणे धान्य खरेदी सुरू आहे. परंतु चेक हत्तीबोडी, घनोटी नं. १ व इतर गावे समाविष्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याकरीता खाजगी व्यापाऱ्यांना बेभावात विक्री करीत आहेत.

      पोंभुर्णा परीसरात चेक हत्तीबोडी, घनोटी नं. १ व इतर गावे धान पिकावार अवलंबून असतात. धान हा पिक शेतकऱ्यांचा एकमेव पिक असून सुद्धा आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे.

    पोंभुर्णा येथे धान्य खरेदी केंद्र सुरू असून सुद्धा या ठिकाणी पोंभुर्णा परीसरातील चेक हत्तीबोडी, घनोटी नं. १ व इतर गावातील धान खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला कमी दरात विकावे लागत आहे. 

     पोंभुर्णा येथे शासनाच्या दराप्रमाणे आदिवासी महामंडळा अंतर्गत तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी‌. अशी कृषी पदवीधर संघटना पोंभुर्णा तालुकाध्यक्ष शुभम रामचंद्र देऊरमल्ले तालुकाध्यक्ष यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 
     
यावेळी कृषी पदवीधर संघटना पोंभुर्णा तालुकाध्यक्ष शुभम रामचंद्र देऊरमल्ले, तालुका उपाध्यक्ष मयुर महादेव देऊरमल्ले, तालुका सचिव खुशाल प्रकाश देऊरमल्ले उपस्थित होते.

पोंभुर्णा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास संपर्क करू शकतात.
शुभम रामचंद्र देऊरमल्ले
मो. क्र:-9158426227