घुग्घुस-वणी मार्गावरील एक तास वाहतुक ठप्प.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- आज दुपारी २ वाजता दरम्यान ताडाली येथुल घुग्घुस रेल्वे सायडिंग येथे येनारी रेल्वे इंजिनचे वँगन चे चाके रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याने घुग्गुस येथील राजीव रतन चौकातील रेल्वे गेट जवळ वाहनांच्या एक किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या तब्बल एक तास या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम केल्याने नंतर वाहतूक सुरळीत झाली सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.