जय भवानी कामगार संघटनेने द्वारा देण्यात आलेल्या उपोषणाला बसण्याचा इशाऱ्याला खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या मध्यस्थीने तूर्तास स्थगित.

Bhairav Diwase

30/10/2020 रोजी उपोषणाला बसण्याचा दिला होता इशारा.
Bhairav Diwase. Oct 28, 200
राजुरा:- नुकत्याच चार दिवसांआधी जय भवानी कामगार संघटना संस्थापक व अध्यक्ष सुरज ठाकरे तथा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवळपुर येथील कंत्राटी कामगार यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून श्री.सुनील ढवस यांनी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांचे निवेदन तथा कामगारांचे होत असलेले शोषण याबाबत निवेदन दिले होते व त्या निवेदनामध्ये दिनांक 30/10/2020 रोजी सदर मागण्या पूर्ण करण्याकरता उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता.


       परंतु या निवेदनाची तात्काळ दखल तथा गोरगरिबांचे हिताचे प्रश्न व कामगारांचे हे त्याच्या मागण्या असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी तात्काळ यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा आश्वासन दिले व तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तथा श्री.सुरज ठाकरे यांना दिनांक 05/11/2020 पर्यंत बैठक लावून सदर मागण्या या प्रशासन व कामगार संघटना यांच्या माध्यमातून चर्चेद्वारे सन्माननीय खासदार यांच्या आदेशानुसार व मध्यस्थीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तोंडी व लेखी आश्वासन दिले असल्याने दिनांक 30/10/2020 रोजी उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय अनिश्चित काळाकरता पुढील चर्चा होईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे असे जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.