आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आज भिसी येथे भाजपा नेते श्री किशोरजी नेरलवार यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी यांची संवाद बैठक संपन्न झाली. चिमूर विधानसभा क्षेत्रांतील भिसी अप्पर तालुका अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रमुख समस्या व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला भाजपा जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री वसंतभाऊ वारजूकर व भिसी व परिसरातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.