ओबीसी युवकांचा 26/11 च्या मोर्चा साठी खेडोपाडी झंझावात.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- लाखमापुर, ऊपरवाही, हरदोना येथे जाऊन तेथील युवकांना जास्तीत जास्त संख्येने 26/11 च्या मोर्चा मधे सामिल होण्या करिता आव्हान करण्यात आले. व गडचांदूर येथून निघणार्‍या बाइक रैली मधे सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले. 
          गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज‌ हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही. 
यावेळी सदर सभेत वैभव राव, प्रेम बुरहान, लीलाधर मत्ते, मयूर एकरे, सागर राले, वैभव डोहे, प्रवीण गुरुनुले, सुयोग भोयर, दत्तू पानघाटे यांनी आव्हान केले.