(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पदवीधर मतदार निवडणूक येत्या 1 डिसेंम्बर ला होणार असून भारतीय जनता पार्टी कडून मा संदीपजी जोशी यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारा करिता आज दि २४/११/२०२० रोजी नागपूर येथील माजी महापौर तथा प्रदेश भाजपा सरचिटणीस मा.सौ.अर्चनाताई डेहानकर, प्रदेश उपाध्यक्ष सौ. मा.वनीताताई कानळे ,चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कुमारी अल्काताई आत्राम यांचे गडचांदूर भाजपा महिला आघाडी कडून सर्वप्रथम शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस मा अर्चनाताई देहनकार यांनी उपस्थितांना पदवीधर मतदार निवडणुकीत आपल्या पक्ष्याकडून मा,. संदीपजी जोशी यांना उमेदवारी दिली असून त्यांना भरघोश मतांनी निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तेव्हा आपण मतदार यादीचे वाचन करून त्या मतदारा कडे जाऊन आपल्या उमेद्वाराला पहिली पसंतीचे मत मागावे.आपल्या पक्ष्यानी दिलेला उमेदवार हा सक्षम असून या पूर्वी युवा मोर्च्या पासून विविध जबाबदारीचे पद सक्षमपणे सांभाळले व लोकांना न्याय देण्याचे काम केले. विशेष म्हणजे त्यांनी नागपूर येथील दोनदा महापौर पद भूषविले याचा नागपूरच्या विकासात त्यांचा मोठा हिंसाचा वाटा आहे.मागील तीन वर्षा पासून ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णाचे नातेवाइका करिता दिनदयाल जेवणाची थाली अत्यल्प दरात देण्याचे काम चालू आहे.आणि आता आपण पदवीधर मतदार निवडणुकीत निवडून पाठविले तर निश्चित त्यांचे कडून प्रमाणिक होतील अशी ग्वाही देते त्यामुळे पहिल्या पसतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले*.
त्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हा महिला आघडीच्या सरचिटणीस म्हणून सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष तर सचिव म्हणून सौ रंजनाताई मडावी व सौ इंदिराताई कोल्हे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या यावेळी उपस्थित गडचांदूर महिला आघाडी च्या सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ रंजनाताई मडावी,सौ सपनाताई सेलोकर,श्रीमती शांताबाई मोतेवाड, सौ शीतलताई धोटे,सौ.बोरीकर ताई,सौ इंदिराताई कोल्हे,सौ.स्वेताताई बनकर नगराधक्ष्य पोंभुर्णा,रजिया कुरेशी उपनगराध्यक्ष पोंभुर्णा, सुनीताताई मेकलवार नगरसेवक पोंभुर्णा, गडचांदूर भाजपा शहराचे अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार,भाजपा जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,निलेशजी ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,गजानन शिंगरू,महेश घरोटे ,गजानन चिरडे,संदीप शेरकि,गणपत बुरडकर,सुधाकर बोरीकर,अरविंद कोरे,आदींची उपस्थिती होती.