युवा मोर्चाचा कार्यकर्त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे:- मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यात युवा मोर्चाचे संघटन मजबूत करावे:- महामंत्री शिवानी दाणी.
प्रत्येक युवकांसाठी राष्ट्र प्रथम असले पाहिजे:- प्रदेश सचिव सोपान कनेरकर
बल्लारपूर:- दि.24/11/2020 रोजी भाजयूमो चंद्रपूर जिल्हातर्फे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन भाजयुमो चंद्रपूर जिल्ह्यातर्फे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला राज्याचे माजी वित्त मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवानी ताई दानी,युवा मोर्चा प्रदेश सचिव सोपानजी कनेरकर,प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुर्के, जेष्ठ नेते चंदनसिंगजी चंदेल, जिल्ह्याध्यक्ष देवरावजी भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश जी शर्मा,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयजी धोटे,माजी आमदार सुदर्शनजी निमकर,जिल्हा महामंत्री नामदेवजी डाहुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिषजी देवतळे,अजयजी दुबे, शिवचंदजी द्विवेदी, जूम्मन रीजवी, काशी जी सिंग, वैशालीताई जोशी,राजू भैय्या दारी,मीना ताई चौधरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अंत्योदय हे लक्ष सामोर ठेऊन समाजात कार्य करावे,तसेच युवकांच्या समस्या घेऊन ते सोडणुकीसाठी सतत प्रत्नशील राहावे, व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सामजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे असे. तसेच येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकित युवा मोर्चाचा चंद्रपूर जिल्ह्यातून सिंहाचा वाटा घेऊन संदीप जोशी यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी कार्य करावे, व पक्षाचा विचार समाजाचा अंतीम घटकापर्यंत पोहविण्यासाठी प्रयत्न करावे व भाजयूमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्ह्यात युवा मोर्चाचे संघटन मजबूत करावे असे आवाहन महामंत्री शिवानी दानी यांनी केले.
युवकांनी समाजात कार्य करीत असताना समाजाचे हित डोळ्यासमोर
ठेऊन काम करावे, व आपला व्ययक्तिक स्वार्थ न बाळगता राष्ट्र प्रथम ठेऊन समाजात कार्य करावे. असे प्रतिपादन भाजयूमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी केले.
या मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून विविध भागातून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची उपस्थित होती.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा जिल्हा महामंत्री महेश देवकते यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष ताजने यांनी केले.