Top News

प्राधान्य कुटुंबातील गरिबांची दिवाळी कडूच.

पुरवठा अधिकारी व पॉकेटफेम चाटुकारांची दिवाळी मात्र गोड.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अन्न धान्य पुरवठा विभागातील अधिकारी प्राधान्य ( पिकेल ) कुटुंबातील लाभार्थ्यांची दिवाळी गोड केल्याचा दावा करीत असले तरी अधिकाऱ्यांच्या लेटलतीफीमुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे ( काही ) इंडेन दिवाळीपूर्वी तयार न झाल्याने अनेक लाभार्थी दिवाळी गोड करण्यापासून वंचित राहिल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
              अन्न पुरवठा विभागाचे दोन हजार फेम अधिकारी आपल्या हाताने आपलीच पाठ कितीही थोपटत असले तरी अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांची दिवाळी केवळ त्यांच्या दिरंगाईमुळे 'कडू' झाल्याने केलेला दिवाळी गोड झाल्याचा दावा निराधार व अविश्वसनीय आहे. या समधात काही गावांतील लाभार्थ्यांच्या भेटी घेतल्या असता त्यांनी दिवाळी नंतर धान्य मिळाल्याचे व अजूनही धान्य वाटप होत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे नोव्हेंबर मध्ये आलेल्या फ्री धान्याचे वाटप काही दुकानातून सुरू असल्याचे कळते.
                   ऑक्टोबर महिन्यात आलेल्या धान्य साठ्याचे वितरण उशिरा झाल्याने व काही दुकानदारांचे इंडेन वेळेत तयार न झाल्याने कोटा मिळण्यास विलंब झाला परंतु ज्या दुकानदाराकडे जुना माल शिल्लक होता तो तीन रुपये दोन रुपये दराने वाटप केला गेला व उशिरा आलेल्या फ्री धान्याचे वाटप दिवाळीनंतर करण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना पैशाचा माल वेळेचा आत मिळू शकला नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची दिवाळी "कभी खुशी कभी गम" प्रमाणे अर्धी गोड अर्धी कडू झाली या सर्व प्रकाराला अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी कारणीभूत असल्याचे समजते.
                         अन्न धान्य पुरवठा विभागाच्या पॉकेटफेम कारभाराचे वृत्त वर्तमान पत्रात प्रसिद्ध होताच आपले पितळ उघडे पडले या भीतीने त्यांचे धाबे दणाणले आहे. या विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर येऊ नये यासाठीच तर दोन हजारांची पॉकीटे काही चाटूकरांना देण्याचा प्रकार घडला. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक ते दीड लाख रुपये कुणाकडून व कसे वसूल केले व या नंबर दोनच्या रकमेचे वाटप कोणी केले याची शहानिशा होणे गरजेचे आहे. एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कशी आली याचे उत्तर पुरवठा विभागातील अधिकारी देऊ शकतील काय ? वरील प्रकार लक्षात घेता पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून त्यांचीचौकशी लाचलुचपत विभागाद्वारे होण्याची गरज आहे व त्यासाठी प्रयत्नही सुरु झाले असल्याचे कळते.
                                प्राधान्य कुटुंबांना दिवाळीच्या दिवसात वेळेवर अन्न धान्य मिळणे हे शासनाचे धोरण होते. त्यामुळे धान्याचे पुरवठा करणे क्रमप्राप्त होते असे असतांना अधिकाऱ्यांनी उपकार केले हे सांगण्याची गरज काय ? स्वाभिमानी लाभार्थ्यांना गरीब ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. संपुर्ण जिल्ह्यात अशा प्रकारचे व्यक्तव्य कोणी केले नाही मग तुम्हाला एवढा प्रसिद्धीचा हव्यास कशाला ? काही पॉकेटफेम चाटुकारांना हाताशी धरून गरिबांच्या गरिबीची थट्टा कशापायी चालवली आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची दिवाळी तर गोड झालीच नाही. ( कडू झाली ) परंतु अन्न पुरवठा अधिकारी व दोन हजार पॉकेटफेम चाटुकारांची दिवाळी मात्र निश्चितच गोड झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याची समजते.
             स्वस्त धान्य दुकानदारांना वेठीस धरून लाखो रुपये वसुली करणाऱ्या पुरवठा विभागाच्या या तथाकथित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टचार्यांची चौकशी जिल्ह्याधिकार्यांनी करावी अशी मागणी जोर धरत असल्याचे वृत्त आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने