Top News

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई हा राज्य स्तरावरील पत्रकार संघ असून या संघातर्गत राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
       विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या संक्रमण काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हा चंद्रपूरच्या मार्गदर्शनाखाली अनेक तालुक्यांनी नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत केली.
          तर काही तालुक्यांनी सतत 8 दिवस जवळपास 300 ते 400 नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली शिवाय या पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोनाच्या संक्रमन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक उपक्रम राबविण्यात आले.
             अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी दिली 2020 च्या फरवरी महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्या मुळे या संघाच्या कार्यकारिणीची सभा झाली नव्हती मात्र सद्यस्थितीत कोरोना काहीसा नियंत्रण आल्यामुळे आज 29 नोव्हेम्बर ला जिल्हा मुख्यालयात जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची सभा पार पडली.
                या सभेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, उपाध्यक्ष प्रदीप रामटेके, सुभाष बुजोने, इ ची मंचावर उपस्थिती होती या निमित्ताने वर्षभराचा आढावा घेण्यात आला तसेच येणाऱ्या पुढील काळात नवनवीन उपक्रम राबविण्याचा सूचना तालुका स्तरावरील कार्यकारिणीला देण्यात आल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने