गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुका अंतर्गत येत असलेल्या धाबा परिसरातील गोजोली येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या संरक्षणाकरिता विद्युत करंट लावत असताना जागीच मृत्यू झाला. सदर मृत्यू इसमाचे नाव साईनाथ दाऊ मेश्राम वय 42 असून ही घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा जाहिरात पहा:-
धाबा परिसरात धान कापणीच्या कामाला वेग आला आहे. अशा स्थितीत वन्यजीवांचा हैदोस धान पिकासाठी नुसकान दायक ठरत असल्याने दिनांक 13 रोजी सायंकाळच्या सुमारास साईनाथ मेश्राम या शेतकऱ्याने रानटी डुकरांच्या संरक्षणाकरिता विद्युत खांबावरून शेती सभोवताल विद्युत तार पसरवित असताना करंट लागून जागीच ठार झाला. सदर मृत इसमाच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा परिवार असून सदर घटनेने गोजोली गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास धाबा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने सुरू आहे.