चालक वाहकासह प्रवासी सुरक्षित असल्याची गडचिरोली आगाराकडून माहिती.
गडचिरोली:- गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या बसला भामरागड लाहेरी मार्गावर झाडे पाडून अडवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनूसार गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस काल लाहेरी येथे मुक्कामी जाणार होती मात्र नक्षल्यांनी भामरागड लाहेरी मार्गावर झाडे पाडून रस्ता अडवला असता चालकाने बस भामरागड कडे आणत असतांना पुन्हा एक झाड पाडून नक्षल्यांनी मार्ग अडवला.
दरम्यान चालक वाहकासह सर्व प्रवासी पायी भामरागड करता निघाले असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती गडचिरोली आगाराकडून मिळाली आहे. तसेच घटनास्थळी नक्षली बॅनर तसेच पत्रके आढळले आहे, नक्षल्यांकडून मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. अधिक तपास गडचिरोली पोलिस करित आहे.