Top News

मनसेच्या मागणीला यश...... उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपणी उपविभाग पोंभूर्णा यांनी घेतली तात्काळ दखल.

पोंभूर्णा येथील ३३ के.व्हि. अंतर्गत वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करण्याची केली होती मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालूक्यात मागील अनेक दिवसांपासून रोज २० ते २५ वेळा विजपूरवठा खंडित होत असून यामूळे समस्त जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्याथ्यांना आनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे पाण्याविना शेतकरी त्रस्त आहे. या सततच्या खंडीत विजपूरवठ्यामूळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करा अन्यथा मनसेकडून आक्रमक आंदोलन केल्या जाईल. या आशयाचे निवेदन कनिष्ठ अभियंता विद्युत पूरवठा कार्यालय पोंभूर्णा यांना जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोरभाऊ मडगुलवार, मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरूपतीवार, मनसेचे पोंभूर्णा तालूका सचिव अमोल ढोले, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे रुग्नमित्र प्रविण शेवते, कौशल चिचघरे, तबरेतज कुरेशी, देवा मानकर आदि मनसैनीक शाखा पोंभूर्णा यांच्या वतीने दि.२८/१०/२०२० ला देण्यात आले होते.

हेही वाचा:- पोंभूर्णा येथील ३३ के.व्हि. अंतर्गत वारंवार खंडीत होणारा विजपूरवठा त्वरीत सुरळीत करा:- मनसे

विद्युत कार्यालयाला ७ दिवसाचे कालावधी दिला होता, ७ दिवसाचे आत या समस्येचे निराकारन न झाल्यास मनसे आक्रमक आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला. संबधीत विभागानी मनसेच्या निवेदनाची दखल घेत विद्युत पूरवठा सुरळीत केला असुन संबधीत विभागाचे मनसे तर्फे धन्यवाद व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने