Top News

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या वतीने सावली तालुक्यात माझी शाळा-माझी सुरक्षा उपक्रम संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर या कार्यक्रमा अंतर्गत माझी शाळा -माझी सुरक्षा हा उपक्रम सावली तालुक्यात राबवण्यात येत आहे. मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन सावली तालुक्यातील ३१ गावांमध्ये खेळाच्या माध्यमातून विकास या कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य,स्वच्छता,चांगल्या पोषणाच्या सवयी,शिक्षणाचे महत्व, स्त्रि-पुरुष समानता,खेळण्याचा अधिकार,जीवन कौशल्य व सामाजिक भावनिक शिक्षण या कार्यक्षेत्रावर काम करीत आहे. या कार्यक्षेत्राला घेऊन ११ ते १४ वयोगटातील मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येते.आणि त्याच बरोबर कॉविड 19 विषयी जनजागृती देखील करण्यात आली. तसेच
               बालक दिनाच्या अनुषंगाने १४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत माझी शाळा माझी सुरक्षा उपक्रम घेण्यात येत आहे. सध्या कोविड १९ मुळे शाळा बंद आहेत जर अश्या परिस्थितीत शाळा सुरू झाल्यास शाळा व बालकांची सुरक्षितता या संदर्भात तालुक्यातील ३१ गावातील विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत व गट चर्चा ( FGD ) व व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांचे मनोगत जाणून घेतल्या जात आहे. तसेच पालक,शाळा व्यवस्थापन समिती, गावातील प्रतिष्ठित नागरिक,आशा वर्कर, यांचे सुद्धा मत जाणून घेतल्या जात आहे. हे उपक्रम घेत असताना शासनाने दिलेल्या दिशा निर्देशकांचे योग्य पालन करून उपक्रम पार पाडले जात आहे. माझी शाळा माझी- सुरक्षा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व स्वयंसेवक. युवा मार्गदर्शक- वसंत पोटे, नंदकिशोर पाल, रोशन तिवाडे, आम्रपाली साखरे तालुका समन्वयक योगिता सातपुते, यांच्या सहकार्यातून जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनातून हे उपक्रम राबविले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने