अपघात व त्यामध्ये मरण पावत असलेली लोक व रेती तस्करी मुळे शासनाचा बुडत असलेल्या महसूल यावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक 12/11/2020 रोजी राजुरा तालुक्यातील विहीरगाव या ठिकाणी सोळा वर्षे उमेश सोनुरले याचे रेती तस्करी करीत असलेल्या ट्रॅक्टरने अपघात होऊन निधन झाले. गेल्या दोन महिन्यांमध्ये या भागातील ही तिसरी घटना आहे अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन कार्यवाही करीत नसल्याचे सर्वत्र बोंबाबोंब आहे व आजच्या घटनेने या भागातील लोकांचा रोष हा प्रशासन व पोलिस विभागात विरुद्ध खूप जास्त वाढलेला आहे हे पाहता आज याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी तथा आज पर्यंत अशा पद्धतीने झालेल्या घटनांमध्ये जी लोक मरण पावले त्यांच्या मरणाचा गुन्हा म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाहनचालक व वाहन मालक यांच्यावर दाखल व्हावा अशी मागणी स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनामध्ये केलेली आहे.
हेही वाचा:- अवैद्य वाळू तस्करीने घेतला एका तरुणाचा बळी. http://www.adharnewsnetwork.com/2020/11/blog-post_52.html?m=1
यापूर्वीदेखील सुरज ठाकरे हे गेल्या सहा-आठ महिन्यांपासून रेती तस्करी व कोळसा तस्करी बाबत आक्रमक आहेत परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे या माफिया सोबत असल्यामुळे प्रशासन कार्यवाही करीत नसल्याचे समोर आले आहे व यामुळे रेती तस्करांची व कोळसा तस्करांची हिम्मत ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे व अशा पद्धतीच्या अनेक घटना या भागांमध्ये होत आहेत व झालेले आहेत दिवाळीनंतर एक मोठे आंदोलन या विरोधामध्ये करण्याचा इशारा सुरज ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे.या सर्व घटनेवरून प्रशासन काय शिकतो यावरच आता सर्व समाजाचे लक्ष लागलेले आहे.