Top News

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase. Nov 28, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           संचालीका सुनंदा लिहितकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या महात्मा फुले हे एक भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारक, लेखक व समाजसेवी होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाच्या संघटनेची स्थापना केली.
 
         गुलामगिरी हे पुस्तक लिहिले स्रियांना शिक्षणाचा अधिकार व दलितांच्या उत्थानासाठी कार्य केले. बाल विवाहास विरोध केला. कुप्रथा, अंधश्रद्धा समाजातुन मुक्त करने यासाठी संपूर्ण जीवन व्यथित केले. असे त्या म्हणाल्या.

          यावेळी निशाताई उरकुडे, सुनंदा लिहितकर, प्रीती धोटे, सोनु बाहादे, प्रिया नागभिडकर, पुजा देशकर, उषा बोंडे, नरेंद्र गाताडे, मोहनीश हिकरे, उमेश दडमल, पंकज रामटेके उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने