Top News

वढा-जुगाद यात्रेवर कोरोनाचे सावट.

कोरोना संकटाच्या खबरदारी करीता यात्रा रद्द.
Bhairav Diwase.    Nov 28, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे दरवर्षी कार्तिक पोर्णीमेला वढा-जुगात गावातील वर्धा-पैनगंगा-निर्गुडा या तिन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर मोठी यात्रा भरते. परंतु कोरोना खबरदारी करीता ३० नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिक पौर्णीमेला भरनार असलेली वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली आहे.

            विठ्ठल-रुख्मिनीचे मंदिर असल्याने भाविक हजारोंच्या संखेत दर्शनासाठी बाहेर गावातुन जिल्ह्यातुन येतात. १५० वर्षाच्या पुर्वीपासुन वढा-जुगाद येथे मोठी यात्रा भरते. 

           नदीच्या पलिकडे जुगात येथे पुरातन हेमाडपंतीय शिव मंदिर आहे तिथे ही भाविक आस्थेने दर्शनासाठी जाताता.
 परंतु यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली आहे. बाहेर गावातुन हजारोंच्या संखेत भाविक येत असल्याने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व एकमेकांशी संपर्कात न येण्यासाठी खबरदारी करीता वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली आहे.
            एका आठवड्यापुर्वी घुग्घुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल गांगुर्डे व वढा ग्रामस्थांची वढा यात्रे संदर्भात वढा गावात बैठक पार पडली. बैठकित एकमुखाने वढा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

         या बैठकित वढाचे उपसरपंच बंटी भोस्कर सचिव श्रीकांत कदम, आशा वर्कर सविता पढाल, अंगणवाडी सेविका छाया गोहकार, माजी पोलीस पाटिल किसन वरारकर, श्रिकांत चौधरी, सुरेश वरारकर व समस्त गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने